डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल घेता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
डीटीएच धारकांसाठी खूशखबर आहे. एका टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करता येणार आहे. लवकरात लवकर एसएमएसच्या माध्यमातून चॅनल जोडण्याची किंवा हटवण्याची सुविधा देण्यात यावी, असे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) दिले आहेत.
डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल घेता येणार आहे किंवा हटवता येणार आहे. ९९९ क्रमांकावर सर्व चॅनल्सची यादी एमआरपीसह उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही ट्रायनं सर्व डीपीओंना दिले आहेत. ही सुविधा दिल्यानं डीटीएचधारकांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडता येणार आहेत. तसंच प्रत्येक चॅनलसाठी आपण किती पैसे मोजणार आहोत याचीही माहिती मिळणार आहे.
९९९ क्रमांकावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायने डीपीओंना दिले आहेत. ट्रायच्या आदेशानुसार, एसएमएसच्या माध्यमातून चॅनल घेण्याची किंवा हटवण्याची सुविधाही डीटीएचधारकांना पंधरा दिवसांच्या आत द्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर ट्रायच्या आदेशानुसार, डीटीएच धारकांनी पाठवलेल्या विनंत्याही डीपीओंना ७२ तासांच्या आत लागू कराव्या लागणार आहेत. तसंच नव्या नियमांनुसार सबस्क्रायबर्सना ज्या कालावधीसाठी सेवा घेतली आहे, तितक्याच कालावधीसाठी शुल्क आकारले जाणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos