आ. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची बुध्द विहाराला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील बुध्द विहाराला भेट दिली.
आ. आत्राम यांनी बुध्द विहारात भगवान गौतम बुध्द आणि  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला अभिवादन केले. यावेळी बुध्द विहारातील पदाधिकारी आणि नागरीकांशी विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी भाजपा, नाविसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बुध्द विहाराचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-10


Related Photos