महत्वाच्या बातम्या

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू साठा नष्ट : स्थानिक गुन्हे शाखा व विरुर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झालाअसून मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री वर आळा घालण्याकरीत चंद्रपूर पोलीसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापना करण्यात आले असून सदर पथकाचे माध्यमातून मोठया प्रमाणात अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्यांचे माहिती काढून त्यावर कारवाई सुरू असून जिल्हयात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैद्य दारू यावर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे.

याच अनुषंगाने आज १८ मार्च रोजी सकाळचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. विरूर अंर्तगत थोमापुर येथे काही इसम व मुडीगेट येथे एक इसम हातभट्टी लावून अवैधरित्या दारू गाळीत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पो.स्टे. विरूर यांचे पथकासह रवाना होवून मौजा थोमापूर येथे पोहचून शोध घेतला असता दोन घराचें परिसरात हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ३१ हजार २००/- रू. चा माल मिळून आले. तर मौजा मुडीगेट येथील एका महिलाच्या घरा मागे कायदेशिररित्या झडती घेतली असता सदर घटनास्थळावर हातभट्टी दारू सडवा व हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २७ हजार २०० रू. चा माल मिळून आला.

सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला असून गुन्ह्यातील फरार आरोपी नामे रवि भद्रु सभावत, रा. थोमापूर ता. राजुरा, किसन बिच्चा घुगलोत, थोमापुर ता. राजुरा, कविता मालोत, रा. मुडीगेट ता. राजुरा यांचे विरूध्द पो.स्टे. विरूर येथे कलम ३२८ भादवी सहकलम ६५ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी हर्षल ऐकरे, सपोनि मनोज गदादे, सपोनि संतोष वाकडे, पोहवा नितिन साळवे, सुभाष गोहोकार, अनूप डांगे, नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगुंडे, मिलिंद जांभुळे, चालक पोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोहवा सुभाष कुळमेथे, मलया नलगेवार, पो.शि. सचिन थेरे, गजानन चारोळे, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रमोद मिलमिले, राहूल वैद्य, मपोशि प्रियंका राठोड, मंगला मेश्राम सर्व पो.स्टे. विरूर यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos