महत्वाच्या बातम्या

 अतिदुर्गम भागातील शाळांना सहाय्यक गटविकास अधिकारी यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळांना शनिवारी १६ मार्च २०२४ ला सकाळ पाळीत शाळा असताना सुद्धा सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम यांनी भेट देऊन पाहणी केले आहे. 

गट्टा केंद्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे भेट देऊन वसतिगृहातील निवास व्यवस्था, कोटीगृह, स्वच्छता गृह, स्वयंपाक गृह इत्यादी बाबींची पाहणी करून स्वच्छता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष देण्याच्या शिक्षकांना सूचना केल्या, त्यानंतर गट्टा पासून जवळच असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल जाजावंडी शाळेला भेट देऊन पाहणी केली. 

शाळेतील विविध उपक्रम बाबत माहिती जाणून घेतली, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जाजावंडी जि.प. शाळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे, ही बाब उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत हितगूज केले, सर्व शालेय प्रशासनाचे निरीक्षण करून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन केले. यावेळी गटसमन्वयक अशोक कोवे, केंद्रप्रमुख एम,सी,बेडके उपस्थित होते.    





  Print






News - Gadchiroli




Related Photos