महत्वाच्या बातम्या

 १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यासाठी सुचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सन २०२३- २४ या शैक्षणिक सत्रात १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमुन्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत ३१ मार्च २०२४ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे दाखल करावे. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा (प्रस्तांवाचा) विचार केला जाणार नाही. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच प्रस्ताव सादर न केल्यास व वैधता प्रमाणपत्रा अभावी अर्जदाराचे व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य व अर्जदारांची राहील.

तसेच या आधी समितीस २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. ज्यांचे प्रकरण त्रृटीत आहेत. अशा सर्व अर्जदारांचे प्रकरण त्रृटीत असल्याने अर्जदारांनी १६ मार्च २०२४ रोजी मंगळवार ला मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यासह समिती कार्यालयात उपस्थ‍ित राहावे.

तसेच सन २०२४- २५ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रस्ताव घेणे चालु असुन कार्यालयामध्ये सादर करावे. शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्पलेक्स़, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे आवाहन उपायुक्त़ डॉ. देवसुदन ना. धारगावे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos