महत्वाच्या बातम्या

 धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत ६ जून २०२४ निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केले आहे.

जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos