डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ.जिचकार यांना भारतरत्न द्या ; प्रगतिशील तिरळे कुणभी समाजाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
प्रगतिशील तिरळे कुणभी समाजाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ. श्रीकांत जिचकार याना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  करण्यात आली आहे. यासाठी २ ऑक्टोबरपासून आजनगाव ( जिचकार ) ते पापळ (देशमुख ) दरम्यान समाज जागृती यात्रा सुरु करण्यात आली आहे. समाजातील प्रतिनिधीतर्फ़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना त्यांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी कल्याणाच्याही मुद्यांचा समावेश आहे.
 शेतकरी कुटुंबातील  सदस्यांना  शासकीय / खाजगी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत धोरण आखणे, शेती व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या वर्गाकरिता व्यावसाईक धोरण आखणे, शेतीकरिता पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव  तिथे धरण, बंधारा योजना गांभीर्याने राबविण्याबाबत धोरण आखणे, ज्या क्षेत्रात जे पीक आहे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करणे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे  मागणी करण्यात आली आहे. समाजाच्या जागृत यात्रेत आजमगाव  येथून समाजबांधव, गावकरी, संस्थेचे पदाधिकारी आणि जेष्ठ समाजसेवक संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने डॉ. श्रीकांत जिचकार यांचा समाधीस्थळाचे  दर्शन घेण्यात आले. यानंतर काटोल, वरुड, मोर्शी, अमरावतीमार्गे मोठ्या संख्येने समाजबांधवानी यात्रा गावात पोहचल्यानंतर स्थानिक गावकर्यांनी यात्रेकरूंचे स्वागत केले. या ठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यात्रेत तुषार ताकतोडेमहेंद्र ठाकरे, नरेंद्र मानकर, विकास इंगोले, मनीष दंडारे. संजय चौधरी, ॲड. रजनीश पोद्धार  सुनील मोहड, विवेक जिचकार, राहुल कराळे, जगदीश मानकर, प्रशांत गोतमारे, आदित्य भालेराव, प्रकाश वर्षे, गौरव पोद्धार, प्रताप वानखेडे, मोरेश्वर घाडावे, हरिभाऊ क्षीरसागर, अजय खंगार, विजय डफरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.     

   Print


News - Nagpur | Posted : 2019-10-09


Related Photos