भंडारा येथे निवडणूक निरीक्षकांकडून मतदान जनजागृती कार्यक्रमाची पहाणी


- जे एम पटेल महाविदयालयात रांगोळी स्पर्धेतून मतदानाची जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरीता  स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हयात तिनही विधानसभा क्षेत्रात स्वीप कार्यक्रमाची मतदान जनजागृती सुरू आहे. भंडारा येथे जे.एम. पटेल महाविदयालयात रांगोळी स्पर्धेतून करण्यात आलेल्या कार्यक्रमाला निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी भेट दिली. त्यांनी विदयार्थी व प्राध्यापकांशी चर्चा करून  मतदानाची व्यापक जनजागृती करण्यासाठी आवाहन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. कृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार पोयाम, प्राचार्य  विकास ढोमणे,  प्राध्यापक डॉ. कार्तीक पनीकर उपस्थीत होते.  शाळा, महाविदयालय स्तरावर निबंध, वक्तृत्व व रांगोळी यासह विविध स्पर्धेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती केली जात आहे. जे एम पटेल  महाविदयालयात मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  येथील विदयार्थीनी सहभाग घेवून मतदानाविषयी रांगोळीच्या माध्यमातून   मतदानाचे संदेश देणाऱ्या चित्रांचे रेखाटन करून मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी आवाहन केले. या स्वीप जनजागृती कार्यक्रमाला निवडणूक निरीक्षक राजेशसिंग राणा यांनी भेट देऊन पहाणी  केली.  रांगोळीतून साकारलेल्या व्होट फॉर बेटर इंडिया,  ना पैसो से ना  नोट से ,किस्मत बदलेगी तो वोट से यासह रांगोळीतून साकारलेल्या विविध संदेशपर चित्रांचे अवलोकन केले. विदयार्थ्यांसोबत  मतदान प्रक्रीयेविषयी संवाद साधला. विदयार्थ्यांना, मतदान प्रक्रीयेत सहभागी  करून घेण्यासाठी पालक, कूटूंबीय, शेजारी, गावकरी यांचेस्तरावर संदेश देवून मतदानाच्या व्यापक जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले तसेच प्राध्यापकांशी संवाद साधला. विदयार्थ्यांच्या माध्यमातून गावस्तरावर मतदानाची जागृती करून मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क्‍ बजावावा यासाठी व्यापक जनजागृती करावी, अशा सुचना  केल्या. विदयार्थींनी काढलेल्या मतदानपर जनजागृती रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले. भंडारा विधानसभा क्षेत्रात स्वीप कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी  जनजागृती पथक कार्य करीत आहेत. 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-09


Related Photos