महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर तालुक्यातील ५०१ नवसाक्षरानी दिली परीक्षा


- ५४ परीक्षा केंद्रवर थेट होते गटशिक्षण अधिकाऱ्यांचे लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान द्वारा केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याद्यान चाचणी परीक्षा रविवार १७ मार्च २०२४ ला घेण्यात आली. या परीक्षेला नव साक्षर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५ वर्षांवरील ६४५ नवसाक्षरांपैकी ५०१ जणांनी परीक्षा दिली व या परीक्षेवर थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष होते त्यांच्या मार्फत गटसाधन व्यक्ती व केंद्रप्रमुख यांनी ५४ परीक्षा केंद्रावर जावून बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर व्यवस्था पाहणी केली.

केंद्र सरकारने २०३७ पर्यंत भारत साक्षर करण्याचा उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था द्वारा केंद्र पुरस्कृत उल्लास साक्षरता अभियान मागील चार महिन्यापासून राबविण्यात येत आहे. यासाठी १४६ प्रशिक्षित स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष निरक्षर व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना पायाभूत साक्षर करण्यासाठी संख्याज्ञान, लिहिणे वाचणे शिकविण्यात आले व त्याअनुषंगाने त्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील ५४ परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा घेण्यात आली ही परीक्षा कठीण जरी असली तरी नवसाक्षारानी जीवनातील एक आव्हान समजून परीक्षा दिली व पेपर सोडविला, त्यांचा आत्मविश्वास पाहून ते नक्कीच साक्षर होणार आणि त्यांना तसे गुणपत्रक व प्रमाणपत्र व लवकरच शासनाकडून मिळणार अशी आशा निर्माण झाली आणि एकंदरीत परीक्षा सुरळीत पार पडल्या.





  Print






News - Chandrapur




Related Photos