शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना १  नोव्हेंबर २०१९ रोजी व त्यानंतर आपण ज्या बँकेतून निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन घेता, त्याच बँकेत हयात असल्याबाबत हयात प्रमाणपत्र (LIFE CERTIFICATE)  सादर करावे लागणार आहे , किंवा कोषागार कार्यालयाद्वारे बँकेस निवृत्तीवेतनधारकांची यादी पुरविण्यात आलेली आहे त्यावर निवृत्तीवेतनधारकांनी स्वाक्षरी करावी. जे निवृत्तीवेतनधारक हयातीचे दाखले बँकांना किंवा कोषागारास सादर करणार नाही किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या यादीवर स्वाक्षरी करणार नाही त्यांचे निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयाद्वारे अदा करण्यात येणार नाही यांची सर्व निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos