सुभाषनगर येथे किटकनाशक फवारणी मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चामोर्शी  :
येथील केवळराम हरडे कृषी महाविध्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषी स्पंदन संघाच्या वतीने सुभाषनगर येथे किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. किटकनाशकांची निवड, खरेदी, हाताळणी व फवारणी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
किटकनाशकांची निवड करताना नुकसानीचा प्रकार,प्रादुर्भावाची तीव्रता, नुकसानाची पातळी, किडीच्या तोंडाची रचना आदींचे निरीक्षण  करण्याबाबत सांगण्यात आले.
किटकनाशकांची फवारणी हि उन्हात व वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने होऊ नये , अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा,टोपी, व मास्क आदींचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी पल्लवी वन्नेवार, प्रिया वाकुडकर,प्रियंका  वासनिक, व वैष्णवी झाडे, तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos