उद्या बाळासाहेब आंबेडकरांची गडचिरोली येथे प्रचार सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारीप बहुजन महासंघ तथा वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर उद्या १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चैक गडचिरोली येथे विधानसभा प्रचार सभेस उपस्थित राहणार असून उपस्थितांना संबोधीत करणार आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डाॅ. रमेश गजबे व भारीप बहुजन महासंघाचे नेते रोहिदास राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या सभेला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच गडचिरोलीचे विधानसभा क्षेत्राचे उमेदवार गोपाळ मगरे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार रमेश कोरचा व अहेरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अॅड. लालसू नागोटी यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos