राज्यात आचारसंहिता काळात ४७७ गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / मुंबई  :
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे या प्रकरणी ४७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाकडून राज्यात काटेकोर पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. २१ सप्टेंबरपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यकाही सुरू, असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्रे, स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी ११३ गुन्हे, लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार १६ गुन्हे, अंमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी व वाहतूक प्रकरणी ७८  कारवाया करण्यात आल्या आहेत. स्फोटके कायद्यानुसार ३ प्रकरणात, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत २३४ प्रकरणात, मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत २५ प्रकरणात तर अन्य विविध अधिनिमांतर्गत ८ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-09


Related Photos