नागभीड व्यापारी संघातर्फे दसरा उत्सव उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी  / नागभीड :
शहरामधील व्यापारी संघा तर्फे दसरा उत्सव दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . शहरा मधून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.  यावेळी श्रीराम, लक्ष्मणजी,हनुमानजी यांची वेशभूषा तयार करून आकर्षक घोडा रथावर शोभायात्रा काढण्यात आली. विविध प्रकारचे, झाक्या देखावे, ढोल ताशे, भजन दिंडी, आखाडा, अतिशबाजीचा नजारा, डीजे, बेंजो, च्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली . हि शोभायात्रा जुना बस स्टॉप ते तहसील ऑफिस च्या मागच्या भव्य मैदाना पर्यंत काढण्यात आली यावेळी  हजारो नागरिक उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणजे ५१ फूट रावणाचा  पुतळा तयार करण्यात आला होता, सायंकाळी ६ वाजता हजारो नागरिकांच्या  समक्ष रावण दहणाचा कार्यक्रम संपन्न झाल. यावेळी  दसरा उत्सव समिती चे अध्यक्ष अमोल गिरीपुंजे, शुभम चिल्लूरे, प्रफुल लांबट, आशिष कामडी, हितेश कावळे, पियुष राहुड, संकेत वारजूरकर व इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन दसरा उत्सव चा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यास अथक परिश्रम घेतले .   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-09


Related Photos