पोलिसांची सोशल मीडियावर वॉच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नगर  : 
विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. उमेदवारांचा नाव, चिन्हाचा प्रचार करण्यात येत आहे. परंतु सोशल मीडियातून एकमेंकाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उमेदवार व समर्थकांचे फेसबूक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्यासाठी सायबर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आलेले आहे. हे पथक सर्व उमेदवारांच्या सोशल मीडिया प्रचारावर लक्ष ठेवून आहे.
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर शहर व जिल्ह्यातील उमेदवारांकडून फेसबूक व व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे. आता प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर मात्र राजकीय पोस्टचा पाऊस पडत आहे. सर्व घडामोंडीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस स्टेशनला एक पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. या पथकाने उमेदवारांचे फेसबूक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुपची माहिती मिळविलेली आहे. उमेदवारांना सोशल मीडियाची खर्चाची माहिती सादर करायची आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जबरोबर प्रतिज्ञापत्रात फेसबूक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुपचे क्रमांक याची माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती पोलिसांना उपलब्ध झालेले आहे. त्यात काही उमेदवारांचे एका पेक्षा जास्त फेसबूक पेज आहे. या पेजवर उमेदवाराकडून काय माहिती टाकले जाते. हे पथक पाहत आहे. वादग्रस्त माहिती सोशल मीडियावर टाकल्यास आढळल्यास उमेदवाराला थेट पोलिस प्रशासनाकडून नोटिसा काढण्यात येणार आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात येणार आहे. उमेदवारांचे फेसबूक पेजवरबरोबर त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांच्या फेसबूक अकाउंटवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. सोशल मीडियावरून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रारी झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून त्या पोलिस प्रशासनाकडे चौकशी पाठविण्यात येणार आहे.
अनेक राजकीय नेत्यांकडे कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे उद्योगी कार्यकर्ते आहेत. त्या कार्य़कर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. उमेदवाराइतकेच लक्ष या उद्योगी कार्यकर्त्यांवर पोलिसांचे आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या उपद्रवी समर्थकांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. संबंधित मतदारसंघ आणि त्या परिसरातील उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते कोण, याबाबतचा गोपनीय अहवाल पोलिसांनी मागविला आहे. त्या अहवालातून, यापूर्वी समाजाला उपद्रवी ठरलेल्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. ते कोणत्या उमेदवारांचे समर्थक आहेत, हे पोलिसांनी हेरून ठेवले आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारानुसार तशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्या याद्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या प्रत्येक उपअधीक्षकांकडे देण्यात येतील. प्रचार अथवा मतमोजणीदरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस दल अगोदर त्या उमेदवारांच्या उपद्रवी समर्थकांना ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्योगी कार्यकर्त्यांची सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
उमेदवार व त्याच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा वापर उमेदवाराचे प्रचारापुरते केला पाहिजे. परंतु, धार्मिक भावना दुखविणे, वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे, खालच्या पातळीवरील माहिती टाकू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडिविणारी माहिती टाकणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर कशा पद्धतीने माहिती पसरविले जाते व लक्ष ठेवण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आलेले आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-10-09


Related Photos