दिव्यांग नव्हे कमतरता, आमच्यातही आहे क्षमता' रामसिंग गावडे यांचे दिव्यांगांना अनुभव कथन


- आम्ही आमच्या आरोग्यासाठीचा अफलातून उपक्रम 
विदर्भ न्युज एक्स्प्रेस
प्रतिनिधी / खुर्सा (गडचिरोली) :
आम्ही आमच्या आरोग्यासाठी, ही संस्था १९८४ पासून चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयाला घेवून काम करीत असून (महिला अधिकार, आरोग्य अधिकार, शिक्षण अधिकार, उपजीविका अधिकार, आणि विकलांग व्यक्तीचे अधिकार)  सध्या कामाचा व्याप वाढून क्षेत्र देखील वाढला आहे, नव्याने गोंदिया, भंडारा हे दोन जिल्हे जुळ्ल्यामुळे चार जिल्हे झालीत, या चार जिल्ह्यातील ११ (आरमोरी, गडचिरोली, धानोरा, कोरची, लाखनी, लाखांदूर, ब्रम्हपुरी, नागभीड, वडसा, अर्जुनी/मोरगाव, कुरखेडा)   तालुक्यामध्ये विकलांग व्यक्तीचे अधिकार (समाज आधारित विकलांगता पुनर्वसन) या विषयाला घेवून काम चालू आहे, यामध्ये. दिव्यांग  व्यक्तीचा काम तीन टप्यामध्ये चालू आहे , पहिल्या टप्यामध्ये गावपातळीवरील अपंग व्यक्तीला शोधणे. त्याचे बचतगट बनविणे, संघटना बनविणे, त्यांना शासकीय योजना मिळण्यासाठी मदत करणे, वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमतावृद्धी करणे, जसे कि संघटना सक्षमीकरण, बचतगट रेकार्ड व्यवस्थापण प्रशिक्षण, आडीट प्रशिक्षण, फिनाईल, हर्फिक, मेणबत्ती, अगरबत्ती, निरमा बनविणे, विणकाम   इत्यादी विषयाचे प्रशिक्षण  देऊन दिव्यांग व्यक्तीची क्षमता वाढविण्याचे काम सुरु आहे, त्याच प्रमाणे सध्या पहिल्या टप्यातील अतिशय मोठ्याप्रमाणात चालणारा व्यवसाय म्हणजे अपंग व्यक्तीला जुन्या साड्यापासून पायदान बनविणे आणि त्याचा व्यवसाय करणे, या व्यवसायामुळे अपंग व्यक्तीला घरी राहून विणकामाच्या माध्यामातून एक उत्पन्नाच साधन मिळाले आहे. यात २३ लोकांचा एक विणकाम गट तयार झाला ,  त्याच प्रमाणे यामुळे लोकांचा  आत्मविश्वास वाढून स्वतःचे काम स्वत: करतात. दुसऱ्या टप्यात दिव्यांग लोकांना व्यवसायाची आवड लागावी. व्यवसाय करून कुटुंबाचा आधार बनावे यासाठी, शेळीपालन, कुकुट पालन प्रशिक्षण देऊन  स्वयंचलित व्यवसाय सुरु कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणे, त्यानंतर याच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शासनाच्या योजनाबरोबर जोडून घेणे, यासाठी प्रयत्न करणे, शेळीपालन प्रशिक्षण मागील १ वर्षात  ११  तालुक्यातील १०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले,  या प्रशिक्षणाचा बऱ्याच लोकांना फायदा  झाला, कोणाचीही मदत  न मागता लोक शेळीपालन व्यवसाय सुरु करू लागले, आज १ वर्षात २६ ते २७ लोकांनी आपला स्वयंस्फ्रुतीने व्यवसाय करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे, तिसऱ्या टप्यात गावपातळीवरील १८ ते ३० वयोगटातील. अस्थिव्यंग, मुकबधीर, कर्णबधीर, अल्पदृष्टी, ४० ते ५०%  अपंगत्वाचे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल अशा दिव्यांगाना म्युर मेमोरीयल हॉस्पिटल नागपूर  मध्ये दोन महिन्याचे कौशल्यआधारित निशुल्क प्रशिक्षण देऊन  त्यांचा जॉब प्लेशमेंट करणे, या  सेंटर मधून आज ५७५ पोर बंगलोर,पुणे, हैद्राबाद,नागपूर नोयडा,अमरावती, इत्यादी ठिकाणी  मोठ्या  कंपनी मध्ये कामाला लागेल आहेत. कुरखेडा तालुक्यातील रामसिंग गावळे तालुका अपंग संघटनेत आपल्या नौकरीच्या प्रवासाबद्दल आणि अपंग व्यक्तीला आदर्श म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाला आम्ही कुठ कमी नाही. “दिव्यांग नव्हे कमतरता, आमच्यातही आहे क्षमता” रामसिंगला  एकच हात असून तो एका हाताने सगळेच कामे करतो, सध्या तो होंडा कंपनी मध्ये कामाला आहे, पण कामातील कौशल्य वाढल्यामुळे मला कंपनी द्वारे माझी बढती होऊन मी मुबईला जाणार आहे, मार्गदर्शन करताना म्हणाला कि संस्थेने खूप मोठ काम आमच्यासाठी केल आहे, गावात अपंग व्यक्तीला काम तर नाहीच पण आमची क्षमता कोणी ओळखत नाही, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचा उपक्रम निराश, नाऊमेद,खचलेल्या लोकांना दिशा दाखवितो, असे रामसिंग गावळे यांनी आनंदाने अनुुभव कथन केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos