परंपरागत संस्कृतीचा वारसा जपत शस्त्र पूजन करीत आ. राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी साजरा केला दसरा उत्सव


असंख्य नागरिकांची उपस्थिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
आमदार  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी परंपरागत संस्कृतीचा वारसा जपत शस्त्र पूजन करीत अहेरी येथील दसरा हा मुख्य सण नागरिकांसमवेत आनंदात साजरा केला.
 ७ ऑक्टोबर रोजी  अहेरी इस्टेटचे राजे तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी राज्यमंत्री  राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम  यांनी   राजघराण्याची परंपरा अविरत चालू ठेवत पारंपारिक शस्त्रांचे पूजन केले. सोहळ्यादरम्यान अहेरीचे युवा नेते कुमार अवधेशराव बाबा तसेच प्रविणराव बाबा उपस्थित होते.
शस्त्रांच्या पूजनानंतर  राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न झाला. पालखी सोहळ्यामध्ये अहेरीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेत उपस्थिती दर्शविली होती. सोहळ्या दरम्यान पारंपारिक ढोल तसेच नगाड्यांचे अतिशय उत्तमरीत्या प्रदर्शन नागरिकांना पहावयास मिळाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos