पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला केले सुपूर्द


- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली विमानाची पूजा
वृत्तसंस्था / नवीदिल्ली : 
फ्रान्सने  पहिले राफेल लढाऊ विमान भारताला सुपूर्द केले आहे.  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. अधिकृतरित्या हे विमान भारताच्या ताफ्यात देण्यात आलं. यावेळी विमानावर ओम काढून, विमानावर नारळ ठेवून राजनाथ सिंह यांनी पूजा केली. राफेलच्या चाकाखाली दोनं लिंबंही ठेवण्यात आली होती.
राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसंच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. राफेल भारताच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आज म्हणजेच ८ ऑक्टोबरला भारताला सोपवण्यात आलं. फ्रान्स भारताला ३६ राफेल विमानं देणार आहे.
 

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

- राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.
- 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
- हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
-  मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.
- यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
- राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
- राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
- हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
-  राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.  Print


News - World | Posted : 2019-10-09


Related Photos