महत्वाच्या बातम्या

  समाजकार्य महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क ,गडचिरोली येथे काल १५ मार्च २०२४ रोज शुक्रवार ला पदवी विभागामार्फत कौशल्य विकास या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा दोन सेशनमध्ये पार पाडण्यात आली. 

१. विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आणि त्यांना सामाजिक समस्या वर चर्चा करायला सांगून त्याचे चांगले, वाईट परिणाम, समस्येचे निराकरण यावर सादरीकरण घेण्यात आले. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून पुढील विषयावर चर्चा आणि सादरीकरण केले. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रियांवरील अत्याचार, आदिवासींच्या समस्या, सुरजागड प्रकल्पाच्या समस्या, कुर्मा घर अशा विविध समस्यांवर समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला आणि या समस्येचे निराकारण करण्याकरिता विविध प्रकारच्या उपाय योजना आपण कशाप्रकारे करू शकतो यावर सादरीकरण केले. 

२. दुसऱ्या सेशनमध्ये कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा. मनोहर हेपट यांनी विद्यार्थ्यांना समुदायांमध्ये कार्य करतांना लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचायचे, त्यांना कसे सहभागी करुन घ्यायचे, त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायच्या याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअर, गडचिरोली येथील प्रकल्प समन्वयक प्रा. मनोहर हेपट तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एस. के. खंगार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यशाळेचे आयोजन डॉ. कविता ऊईके यांनी केले असून कार्यशाळेचे संचालन अभिषेक कोठारे व प्रस्ताविक प्रा. सरिता बुटले यांनी केले तर आभार अविनाश उराडे यानी मानले. कार्यशाळेला बी.एस.डब्ल्यू. भाग १, २, व ३ चे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos