साईंच्या भिक्षा झोळीत भरभरून दान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी : 
शिर्डी येथे काल सकाळी ९  वाजता शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा  अर्चनाताई कोते, उप मुख्‍य  कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संस्‍थान कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. या भिक्षा झोळीत ग्रामस्‍थ व साईभक्‍तांनी रोख स्‍वरुपात रुपये ६५ हजार ७२ तर गहु ९८७४ किलो ग्रॅम, बाजरी ७३ किलो ग्रॅम, तांदुळ ७९५ किलो ग्रॅम व हरभरा दाळ असे धान्‍यरुपाने सुमारे १०१ पोत्‍यांचे भरभरुन दान दिले.   Print


News - Rajy | Posted : 2019-10-09


Related Photos