केबल ग्राहकांना आता १३० रुपयांत दीडशे चॅनेल पुरविणार


- ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनचा निर्णय 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
वाढलेल्या दरांमुळे डीटीएच सेवा खंडीत करणाऱ्यांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे केबल ग्राहकांना आता १३० रुपयांत दीडशे चॅनेल पुरविण्याचा दिलासादायक निर्णय ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (एआयडीएफसीई) ने घेतला आहे. चॅनेल पॅकेजमध्ये बदल करत हा ग्राहकहिताय निर्णय घेण्यात आला आहे.
'ट्राय'च्या विद्यमान नियमांनुसार, महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागत आहे. यात १०० चॅनल देण्यात येतात. त्यावरील प्रत्येक चॅनलसाठी ५० पैशांपासून ते १९ रुपये आणि त्यावर सेवाकर आकारण्यात आले आहे. त्यानुसार सध्या पसंतीच्या असलेल्या चॅनलची संख्या लक्षात घेता ग्राहकाला 'केबल'साठी दरमहा किमान ५०० ते एक हजार रुपये मोजावे लागत आहे. ग्राहकांना १३० रुपयांत १०० चॅनल्स मोफत दिसतात. त्यात 'फ्री टू एअर' तसेच फारसे लोकप्रिय नसलेल्या चॅनलची संख्या अधिक आहे. याशिवाय अन्य चॅनल हवे असल्यास ग्राहकाला प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या चॅनलचे पॅकेज घ्यावे लागत आहे. यावरून ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ग्राहकांमध्ये असलेल्या नाराजीचा विचार करता संघटनेने नवीन पॅकेज जाहीर केले आहे. ग्राहकांना आता केवळ १३० रूपयांमध्ये १५० टीव्ही चॅनेल बघायला मिळणार आहे. याआधी युजर्सला शंभरपेक्षा अधिक चॅनेल्स बघण्यासाठी वीस रुपये अतिरिक्त द्यावे लागत असे. त्याचबरोबर जीएसटीदेखील अतिरिक्त द्यावा लागत असे. आता यातून ग्राहकांची सुटका होणार आहे. परंतु, या सुविधेचा लाभ मिळविण्यासाठी डीटीएच युजर्सला काही दिवस वाट बघावी लागणार आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-10-08


Related Photos