चंद्रपूरचे माजी नगराध्‍यक्ष प्रभाकर पटकोटवार यांचा भाजपात प्रवेश


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
चंद्रपूरचे माजी नगराध्‍यक्ष प्रभाकर पटकोटवार यांनी त्‍यांच्‍या समर्थकांसह काल सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत प्रभाकर पटकोटवार यांचा प्रवेश झाला.
 यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार ॲड. संजय धोटे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते प्रमोद कडू, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, चंद्रपूर महापौर   अंजली घोटेकर, प्रकाश धारणे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचा दुपट्टा घालुन त्‍यांचा स्‍वागत केले व पक्ष प्रवेशाबाबत शुभेच्‍छा दिल्या. पुढील काळात शहरात भाजपाचे संघटन वाढविण्‍यावर आपला भर राहील, असे प्रभाकर पटकोटवार यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांची उपस्थिती होती.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-08


Related Photos