महत्वाच्या बातम्या

 २१ मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येतात. त्यानुसार वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात २१ मार्च २०२४ रोजी लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला होता. 

मात्र शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे २१ मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प रद्द करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos