८ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष


– घटना

 १९३२: इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.

– जन्म

 १८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)
१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)
१८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)
१९२२:संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)
१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)
१९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)
१९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.
१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)
१९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.
१९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.
१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.
१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.

– मृत्यू

 १३१७: जपानचे सम्राट फुशिमी यांचे निधन. (जन्म: १० मे १२६५)
१८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)
१९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)
१९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८८३)
१९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)
१९९६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)
१९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.
२०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)
२०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.



  Print






News - todayspecialdays | Posted : 2019-10-08






Related Photos