महत्वाच्या बातम्या

 माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी मोहिमेस सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शेतकऱ्यांच्या अडचणी, कृषी तंत्रज्ञान व कर्ज व सामाजिक सुरक्षेबाबत  माहिती देण्यासाठी जिल्ह्यात लवकरच माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी  कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आत्माच्या प्रकल्प संचालक नलीनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, सहकारी विभागाचे बी. के. बेदरकर, उपसंचालक अनिल उपरिकर, नाबार्डचे अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

या मोहीमेत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व महसूलअधिकारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांच्या अडचणी जाणून घेवून कृषी तंत्रज्ञान, कर्ज व सामाजिक सुरक्षेबाबत माहिती देणार आहे. ही मोहीम 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos