महत्वाच्या बातम्या

 ५ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : न्यायालयीन प्रक्रियेत विविध तारखांमध्ये पक्षकारांच्या वेळेचा होणारा अपव्यय टाळला जावा, सामोपचाराने आपआपसातील वाद मिटावे, पक्षकारांना त्वरीत न्याय मिळावा या मुख्य उद्देशाने ५ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतमध्ये अधिकाधिक प्रकरणे सामोपचाराने मिटावीत यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण, तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी ही राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश सचिन एस. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या लोक अदालतीत समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, रक्कम वसूली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, राज्य परिवहनाची प्रकरणे, वैवाहिक / कौटुंबिक प्रकरणे, श्रमिकांचे वाद, त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे, कामगारासंबधी दावे, भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, घरपट्टी, वीज आणि पाणी बिलाची प्रकरणे, सेवानिवृत्ती नंतरची प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे, ग्राहक तक्रार, न्यायालयात दाखल न झालेली म्हणजेच दाखलपूर्व प्रकरणे समझोत्याने निकाली काढल्या जातील. सर्व संबधितांसाठी ही राष्ट्रीय लोक अदालत सामोपचाराने न्यायासाठी तत्पर असून याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश सचिन एस. पाटील यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos