महत्वाच्या बातम्या

 जलजागृती  सप्ताहात १६ ते २२ मार्च दरम्यान होणार विविध उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जलसंपदा विभागातर्फे दरवर्षी जलजागृती सत्ता निमित्य विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील १६ ते २२ या सप्ताह दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी -

१६ मार्च, रोजी सकाळी १० वाजता वैनगंगा नदीघाट जुना पुल महादेव मंदिराजवळ जलपूजनाची रॅली शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच अधिक्षक अभिंयता यांच्या हस्ते होणार आहे. तसेच वैनगंगा नदीघाट ते खामतलाव शितला माता मंदिर जवळ समारोप मोटार सायकल रॅली निघणार आहे.

तसेच १७ ते १९ मार्च, रोजी सकाळी १० वाजता ते सांयकाळी ६ वाजेपर्यत भंडारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील पुर्ण झालेल्या व बांधकामाधिन प्रकल्पांचे लाभक्षेत्रातील गावे व त्यांनतर प्रभात फेरी पाणी वापर संस्था व लाभधारक शेतकरी मेळावा चित्रकला स्पर्धा प्रबोधन पथनाटय व जलप्रतिज्ञा पाणीपट्टी वसुली प्रबोधन तसेच सर्व संबंधित कार्यकारी अभियंता, स.अ.श्रे. १ यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर २१ मार्च २०२४  रोजी दुपारी १ वाजता शेळी उपसा सिंचन योजना व शेतकरी संवाद कार्यकारी अभियंता, अविल बोरकर यांचे हस्ते होणार आहे. यानंतर २१ मार्च २०२१ रोजी दुपारी ३ वाजता जे.एम. पटेल महाविद्यालया,येथे कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग आंबाडी यांच्या हस्ते व वैनगंगा नदी प्रदुषण व त्यावरील उपाययोजना या विषयावर वक्कृत्व स्पर्धा करण्यात येणार आहे.

व २२ मार्च २०२४ सकाळी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालये तसेच शाळा महाविद्यालयात जलप्रतिज्ञा कार्यक्रम राबविणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता आंबाडी वसाहत सभागृह अधिक्षक अभियंता गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ आंबाडी भंडारा येथे समारोप होणार आहे. असे आवाहन उपकार्यकारी अभियंता गोसीखुर्द उपसा सचिंन विभाग आंबाडी भंडारा या विभागानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos