माध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडणूक निरीक्षकांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली  :
उमेदवारांच्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे व पेड न्यूजवरती लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या माध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडणूक निरिक्षक प्रविण गुप्ता व आर.एस.धिल्लन यांनी भेट दिली. जिल्हा माहिती  कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्ष (MCMC) स्थापन केला आहे. याचे अध्यक्ष जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह आहेत. तर सदस्य सचिव म्हणून सचिन अडसुळ, जिल्हा माहिती अधिकारी आहेत. तसेच समिती सदस्य कृष्णा रेड्डी उपस्थित होते.
यावेळी प्रविण गुप्ता व आर.एस.धिल्लन यांनी कक्षातील टि.व्ही, सोशल मीडिया व वर्तमानपत्र कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी पेड न्यूज व सामाजिक माध्यमावरील पोस्ट याबाबत जागरुक राहून त्याची कल्पना आयोगाला द्या अशा सूचना दिल्या. तसेच उमेदवारांकडून जाहिरात प्रमाणिकरणासाठी अर्ज आल्यास तात्काळ 48 तासात छानणी करुन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.


काय आहे MCMC कक्ष ?

 निवडणुकीसाठी नामांकरण दाखल केलेल्या उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहिरात द्यायची असेल तर त्याचे प्रमाणपत्र या कक्षाकडून घेणे गरजेचे असते. त्यासाठी या समितीकडे अर्ज करावा लागतो. या समितीकडून तो व्हिडीओ तपासून त्या उमेदवाराला आक्षेपार्ह मजकूर काढण्यास सूचना दिल्या जातात. जर जाहिरात योग्य असेल तर त्यासाठी प्रमाणपत्र दिले जाते. इलेक्ट्रॉनिक व सामाजिक माध्यमांनी सदर प्रमाणपत्र पाहूनच जाहिरात प्रसिद्ध करावी असे अपेक्षित आहे. तसेच वर्तमानपत्रातील उमेदवारांच्या जाहिरातीवरील खर्चाचे तपशील याठिकाणी तपासून आयोगाला सादर केले जातात.
              तसेच या कक्षात 'पेड न्युज' बाबत दैनिक स्वरुपात सर्व बातम्यांची पडताळणी केली जाते. पेड न्यूज बाबत याठिकाणी तक्रारी आल्यास त्या समितीपुढे मांडल्या जातात. निवडणुकीच्या 48 तास आधी MCMC कडून प्रिंट मीडियामध्ये जाहिरात देण्यासाठी सुद्धा या कक्षाचे प्रमाणपत्र उमेदवारांना आवश्यक आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-07


Related Photos