नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील ऑफलाईन पर्यटन १५ ऑक्टोबर पर्यंत बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
दरवर्षी प्रमाणे या वर्षी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन १६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत अंतर्गत व्यवस्थापनाच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेले होते. १ ऑक्टोबर २०१९ पासून पर्यटन हंगाम सुरु होत असल्यामुळे पावसाच्या परिस्थितीनुसार १५ ऑक्टोबर  २०१९ पर्यंत ऑफलाईन निसर्ग पर्यटन सुरु करण्याचा विचार होता, पंरतु यावर्षी  संततधार पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती लगेच होऊ शकत नसल्याने १  ऑक्टोबर २०१९ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१९ पासून निसर्ग पर्यटन हंगामास सुरुवात होणार आहे. याची व्याघ्र प्रकल्पास भेट देणाऱ्या सर्व निसर्ग प्रेमी व संबंधित व्यक्ती व संस्थांनी नोंद घ्यावी.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-07


Related Photos