ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / चंद्रपूर  :
  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या बछड्याचा म्हणजेच मीरा वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना आज सकाळी उघडकीस आली.
आज सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पांढरपवनी येथे राहणाऱ्या प्रख्यात माया वाघिणीचा बछडा पंचधारा या भागात मृतावस्थेत आढळला. त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
रानगवा किंवा रानडुकराच्या हल्ल्यात या बछड्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बछड्याच्या गळ्याला जखम असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-07


Related Photos