११ ऑक्टोबर ला जर्मनीमध्ये ‘२१ व्या शतकासाठी गांधी’ विषयावर डॉ. अभय बंग यांचे भाषण


- गांधी १५० या विशेष कार्यक्रमाचे आयोजन  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महात्मा गांधी याच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफुर्ट येथे शहराचे लॉर्ड मेयर व भारत सरकारचे राजदूत यांनी संयुक्तपणे ‘गांधी १५०’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात ‘गांधी’ या विषयावर बोलण्यासाठी डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना निमंत्रित केले आहे.
 ११ ऑक्टोबर ला सेंट पॉल चर्च या ऐतिहासिक भव्य वास्तुमध्ये हा कार्यक्रम होत आहे. फ्रँकफुर्टचे लॉर्ड मेयर पीटर फील्डमन, भारताच्या राजदूत श्रीमती प्रतिभा पारकर आणि फ्रँकफुर्टचे प्रतिष्ठित नागरिक, विदेशी राजनैतिक व कंपन्यांचे सीईओ उपस्थित राहतील. डॉ. अभय बंग तिथे ’२१ व्या शतकासाठी गांधी’ या विषयावर संबोधित करणार आहे.
   डॉ. अभय बंग हे गांधीवादी प्रा. ठाकुरदास व सुमनताई बंग यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे सर्व बालपण व शालेय शिक्षण गांधी आणि विनोबांच्या आश्रमात व त्यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये ‘नयी तालीम’ शिक्षण पद्धतीत झाले. गडचिरोली येथे जाऊन आदिवासी व गावांची सेवा करण्याच्या प्रेरणेपासून तर ‘आरोग्य स्वराज्य’ या कार्यदृष्टी पर्यंत सर्वच आपण महात्मा गांधींपासून घेतले, असे ते म्हणतात. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ७ ऑक्टोबरला डॉ. अभय व डॉ. राणी बंग जर्मनीला रवाना झाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-07


Related Photos