उद्या उमेदवारी मागे घेण्याचा दिवस


- ६६  उमेदवारांचे नामांकन ठरले आहे वैद्य
-  मंगळवार पासून सुरू होणार निवडणुकीचा प्रचार
-  प्रचारदम्यान निवडणुक आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करीता दाखल करण्यात आलेल्या पक्ष व अपक्ष उमेदवारांकरीता उद्या  7 ऑक्टोबर ला नामांकन मागे घेण्याचा दिवस आहे. जिल्हातील तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात 66 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरविण्यात आले आहे. तीनही क्षेत्रात एकुण 70 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. परंतु छाननी अंती 4 उमेदवारांचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे. मंगळवार पासून निवडणूक प्रचार करता येणार आहे. यादम्यान प्रचार करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन यांनी केले आहे.    
60-तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण  16 उमेदवारांनी 28 नामांकन दाखल केले होते. छाननीअंती येथे एका  उमेदवाराचे  नामांकन अवैद्य ठरले. येथे 15 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरले आहे.
61-भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 26 उमेदवारांनी 39  नामांकन दाखल केले होते. छाननीअंती येथे ही एका  उमेदवाराचे नामांकन अवैद्य ठरविण्यात आले आहे. या क्षेत्रात 25 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरलेले आहे.
62-साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 28 उमेदवारांनी 42  नामांकन दाखल होते.  छाननीअंती येथे दोन उमेदवारांचे नामांकन अवैद्य ठरले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात 26 उमेदवारांचे नामांकन वैद्य ठरले आहे.  

तीनही विधानसभा क्षेत्रात 4 ऑक्टोबर पर्यंत 70 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. नामांकन अर्जाची छाननी केल्यानंतर 60-तुमसर 15 उमेदवार, 61- भंडारा 25 उमेदवार तर 62- सकोली  26 उमेदवार असे एकूण 66 उमेदवारांचे नामांकन तीनही क्षेत्रात वैद्य ठरले आहे. 7 ऑक्टोबरला उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर  व साकोली यांच्या सतरावर इच्छूक उमेदवारांना आपले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. नामांकन मागे घेण्याच्या प्रक्रिये नंतर तीनही विधानसभा क्षेत्रात एकुण उमेदवारांची सख्या निश्चित होईल. सध्या पक्ष व अपक्ष उमेदवारांचे नामांकन दाखल झालेले आहे.  8 ऑक्टोबर पासून तीनही क्षेत्रामध्ये  प्रचाराला सूरूवात होणार असून दिनांक 19 ऑक्टोबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. ठरलेल्या कालावधीत प्रचार करतांना निवडणुक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन यांनी केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-10-06


Related Photos