महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील साहिल रामटेके ठरला राष्ट्रीय युवा भूषण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : युवक बिरादरी भारत या नामवंत संस्थेच्या वतीने युवकांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि खऱ्या अर्थाने युवक हा समृद्ध व्हावा अशा अनेक युवकांच्या हिताचे हेतू डोळ्यापुढे ठेवत गेली पन्नास वर्षे ही युवक बिरादरी नावाची संस्था केवळ राज्यपातळीवर नाही तर देशपातळीवर नवनवीन उपक्रम राबवत असते. ज्यामध्ये महत्त्वाची मानले जाणारे युवा संसद आणि युवा भुषण या दोन स्पर्धा असतात. ज्यामध्ये राज्यपातळीवरील, देशपातळीवरील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत असतात. मार्च २०२३ मध्ये मुंबई येथे झालेल्या युवा संसद या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये साहिल साक्षकार रामटेके याची विरोधी पक्ष उपनेते पदी निवड झाली होती. 

तिथेही त्याने यश संपादन करून राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेवर आपले नाव कोरले होते. आणि यंदाही युवक बिरादरी भारत यांच्या वतीने डिसेंबर २०२३ मध्ये भावी मंत्री म्हणून माझा जाहीरनामा ही स्पर्धा घेण्यात आली होती. 

ज्यामध्ये साहिल रामटेके याने गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व पार पाडत माझा शिक्षण मंत्री म्हणून जाहीरनामा प्रस्तुत करत तिथेही प्रथम क्रमांक पटकावला. आणि आणि नंतर साहिल ची थेट निवड ही राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युवा भूषण या स्पर्धेसाठी झाली. आणि ही राष्ट्रीय स्तरावरील युवा भूषण स्पर्धा १२ मार्च २०२४ ला मुकेश पटेल सभागृह मुंबई इथे आयोजित करण्यात आली होती. 

ज्यामध्ये विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. मात्र या स्पर्धेत साहिलच्या खांद्यावरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भाचेच प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी नाही तर अख्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली होती आणि ती अतिशय योग्य आणि तार्किक बुद्धीचा वापर करून साहिलने ही जबाबदारी पार पडली आणि या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरती साहिलने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आणि राष्ट्रीय युवा भूषण ठरत महाराष्ट्र राज्याला देश पातळीवर अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिले. 

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. राम चड्डा, युवक बिरादरी भारत चे सर्वेसर्वा पद्मश्री क्रांती शाह, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आई नार्वेकर, स्वर शाह आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते. या विजयाबद्दल साहिल चे महाविद्यालयाकडून, मित्रपरिवाराकडून, तुळशी गावाकडून अशा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून आनंद साजरा होतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून माझ्या मराठमोळ्या तमाम माणसांचा आणि महाराष्ट्राचा आहे. अशी विजयानंतरची प्रतिक्रिया साहिल ने प्रसार माध्यमांना दिलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos