निवडणूक व मतमोजणी दिनी देशी विदेशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता 21 ऑक्टोबर 2019 रोजी होत आहे. तसेच 24ऑक्टोबर 2019  रोजी मतमोजणी  होणार आहे.    ही निवडणूक खुल्या, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रीया संपण्याच्या वेळेपूर्वी  48 तासामध्ये मद्यविक्री करण्यास मनाई  / कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली  आहे. त्यानुसार मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर दिनांक 19 ऑक्टोबर 2019 च्या सायंकाळी 6 वाजतापासून पुढे, मतदानाच्या पूर्वीचा पूर्ण दिवस 20 ऑक्टोबर 2019 व मतदानाचा  पूर्ण दिवस 21ऑक्टोबर 2019   तसेच  मतमोजणीचा दिवस 24 ऑक्टोबर 2019  मतमोजणी संपेपर्यंत या चारही  दिवशी  मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
निवडणूक प्रक्रीया पार पडण्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हयातील देशी / विदेशी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी  जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन  यांनी  महाराष्ट्र देशी दारु नियमावली 1973 व नियम 26 (सी)(1) व मुंबई विदेशी मद्य नियमावली 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (1)  व महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) मधील तरतूदींनुसार जिल्हयातील  सर्व देशी विदेशी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती (सीएल-2, सीएल-3,एफएल-2, सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-3, एफएल/बीरआर-2 )  बंद ठेवण्याचे जारी केले आहे. 
या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची  नोंद घ्यावी.     Print


News - Bhandara | Posted : 2019-10-06


Related Photos