मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. शासन निर्णय 25 सप्टेंबर 2019 अन्वये मतदानाचे दिवशी मतदार क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर सुट्टी ही निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. 
तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल,  असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम.जे. प्रदिप चंद्रन  यांनी कळविले आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-06


Related Photos