सिरोंचा - चेन्नूर बससेवेचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिरोंचा :
प्राणहिता नदीवर निर्माण करण्यात आलेल्या पुलामुळे तेलंगणा आणि महाराष्ट्र मधील नागरीकांचे आवागमन वाढले असून प्रवाशांच्या सोयीसाठी आज सिरोंचा - चेन्नूर बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
तेलंगणा राज्यातील चेन्नूर हे सिरोंचा येथून २५ किमी अंतरावर आहे. सिरोंचा येथून मोठ्या प्रमाणात नागरीक तेलंगणा राज्यात कामानिमित्त जातात. तसेच नातेवाईकही मोठ्या संख्येने आहेत. यामुळे आधी डोंग्याच्या सहाय्याने नागरीक नदीतून प्रवास करीत होते. मात्र प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आल्यापासून वाहनांचे आवागमन सुरू झाले. यामुळे नागरीकांचे आवागमन वाढले. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने बससेवा सुरू केली आहे. आज बससेवेच्या शुभारंभप्रसंगी बसस्थानक प्रमुख, चालक, वाहक व प्रवाशी तसेच नागरीक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-06


Related Photos