अहेरी - आलापल्ली मार्ग खड्ड्यात, खड्डे बुजविण्यासाठी ऑटो चालक - मालक संघटनेचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
अहेरी - आलापल्ली मार्ग खड्ड्यात गेला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहने धावतात. या प्रवासी वाहनधारकांनासुध्दा त्रास  तसेच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे ऑटो चालक - मालक संघटनेनेच मोठे खड्डे बुजविण्याची मोहिम सुरू केली असून ही बाब सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींना लाजविणारी आहे.
मागील अनेक दिवसांपासून अहेरी - आलापल्ली  मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवस - रात्र या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुरू असते.  बससेवा आहे. मात्र मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे नागरीकांना शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. तरीही सबंधित विभागाला जाग आलेली नाही. वाहनधारकांना कसरत करत वाहने काढावी लागत आहेत. यामुळे ऑटो चालक - मालक संघटनेनेच पुढाकार घेत खड्ड्यांमध्ये मुरूम - गिट्टी टाकून खड्डे बुजविणे सुरू केले आहे. जवळपास ७० टक्के  खड्डे वाहन चालकांनी बुजविले आहेत. अजूनही खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.  यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सबंधित लोकप्रतिनिधी केवळ बघ्याचीच भूमिका निभावणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-06


Related Photos