महत्वाच्या बातम्या

 पेडन्यूजला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष द्यावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा निवडणुकीत पेडन्युजला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिल्या.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात करण्यात आली. या समितीची पहिली बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, समितीचे सदस्य तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव श्वेता पोटुडे-राऊत, समितीचे सदस्य प्रकाश कथले, अजय तिगावकर, सायबरचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यावेळी उपस्थित होते.

निवडणुकीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या संदस्यांनी आपसामध्ये समन्वय साधून कामे करावी. निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारांना प्रचार साहित्याचे वेळेत प्रमाणिकरण देण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच समाज माध्यमांवर लक्ष केंद्रीत करुन आक्षेपार्ह पोस्टवर समितीने वेळेत कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.





  Print






News - Wardha




Related Photos