निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
निवडणूक अधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरचे सगळे आक्षेप फेटाळले आहेत. देवेंद्र  फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवार यांनी याबाबत हरकत उपस्थित केली. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र हे नोटरी समक्ष सादर केले आहे. त्याची मुदत 28 डिसेंबर 2018 रोजी संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच प्रतिज्ञापत्राच्या सीलवर 28 डिसेंबर 2018 ही तारीख आहे. तर नोटरीच्या आडव्या शिक्क्यावर 3 ऑक्टोबर 2010 ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे शपथपत्र अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवून ते स्वीकारु नये अशी मागणी करण्यात आली.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी उपरोक्त नमूद पुरुषोत्तम मोरेश्वर सोनटक्के यांच्या व्यवसाय प्रमाण पत्राची प्रत आज  5 ऑक्टोबर रोजी हरकत उपस्थित झाल्यावर केली आहे. सदर व्यवसाय प्रमाणपत्राला 29 डिसेंबर 2018 पासून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे दिसून आले. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतदार आणि हरकतीत तथ्य नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या नमुना 26 मधील शपथपत्रानुसार देवेंद्र फडणवीस हे 2009 ते 2014 या कालावधीत आमदार होते. तसेच 2014 पासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. या कालावधीत त्यांच्याकडे मुंबई आणि नागपूर येथील आमदार निवासामध्ये खोली होती. मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईतील मलबार हिल येथे वर्षा बंगला आणि नागपूर येथे रामगिरी बंगला होता. या दोन्ही शासकीय निवासस्थाबाबत थकबाकी नसल्याची माहिती नमुना 26 मध्ये नसल्याने प्रथमदर्शनी ते अपूर्ण आहे असं सांगत ते स्वीकारु नये अशी मागणी केली होती.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे ना-देय प्रमाणपत्र स्वतंत्ररित्या दाखल केली आहेत. त्याबाबत माझी खात्री झाली आहे त्यामुळेच हाडके यांनी दाखल केलेली हरकत मी फेटाळतो आहे असेही निवडणूक अधिकाऱ्याने म्हटले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-10-06


Related Photos