महत्वाच्या बातम्या

 राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांची माहिती सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दरमहा मानधन देण्याची योजना सुरू असून या योजनेंतर्गत अ, ब आणि क श्रेणीसाठी मानधन दिले जाते. या योजनेसाठी लाभार्थ्यांची माहिती पंचायत समितीमध्ये नियुक्त केलेल्या समन्वयकाकडे १५ मार्चपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

सद्यस्थितीत या योजनेखाली लाभार्थ्यांची निवड, जिल्हास्तरावरील निवड समितीमार्फत होत असते. या योजनेंतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून १०० कलाकार व साहित्यिकांची निवड करण्यात येत असते. सन १९५४-५५ पासून सुरू झालेली ही योजना २०१६ पर्यंत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत होती. २०१५-१६ पासून ही योजना सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेखालील लाभार्थ्यांची व्यक्तिगत माहिती जसे की- आधार क्रमांक, संपर्क क्रमांक, कलेचा प्रकार तसेच इतर आवश्यक माहिती प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असल्याने मान्यवर वृद्ध कलावंतानी कलाकार व वारसदाराचे नाव, पत्ता कलाकार व वारसदारांना कधीपासून मानधन मिळत आहे. कलाकार व वारसदाराचे वय, कलाप्रकार आधार क्रमांक, संपर्क क्रमांक बँक तपशील- खाते क्रमांक व आयएफएससी कोड तसेच कलाकार व वारसदार एकत्र फोटो सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos