सत्तेचा दुरुपयोग करुन नियमबाह्यरित्या जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज कापला : किशोर जोरगेवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी करावी लागणारी पूर्ण प्रक्रिया मी केली. सर्व सत्यप्रत काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाबरोबर जोडल्या मात्र, फक्त किशोर जोरगेवार हा  काँग्रेस चा उमेदवार नको या सुडभावनेतून सत्तेचा दुरुउपयोग करत नियमबाह्य रित्या माझी उमेदवारी कापण्यात आली. अशी खळबजळ जनक माहिती आज आयोजीत पत्रकार परिषदेत यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी दिली. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक बलराम डोडानी, दिपक दापके आदिंची उपस्थिती होती.
मी मागील १५ वर्षापासून काम करत आहे. हे काम करत असतांना जनतेच्या समस्यांना घेऊन अनेक आंदोलने केलीत. यामूळे चंद्रपूरच्या जनतेमध्ये माझ्या प्रती आपूलकीची भावणा निर्माण झाली. याचीच दखल घेत काही महिण्यांपूर्वी  काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काग्रेस पक्षाकडून चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान निवडणूक जवळ येताच मी  काँग्रेस  पक्षाच्या वरिष्ट नेत्यांच्या संपर्कात होतो. मला दिल्ली येथे बोलाविण्यात आले. यावेळी  काँग्रेसच्या cwc बैठक पार पडली या बैठकीत माझे नाव  काँग्रेस  पक्षातर्फे चंद्रपूर विधानसभा ७१ मधून निश्चीत करण्यात आले. तशी नाव असलेली यादीही मला दाखविण्यात आली. त्यामुळे मी दिल्ली येथे ३० आँक्टोबरला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे , अखिल भारतीय कॉग्रेसचे सचिव मुकुल वासनिक , के.के. वेणुगोपाल, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार , प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात  , आशिष दुआ , प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष नंदू नागरकर , घुग्घुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या उपस्थित  काँग्रेस  पक्षात प्रवेश केला. यावेळी मला सांगण्यात आल्यानूसार  काँग्रेस  पक्षाच्या दूस-या यादित माझे नाव येणार होते. मात्र प्रकाशीत झालेल्या काँग्रेसच्या दुस-या यादित माझे नाव डावलण्यात आले. यावेळी मी वरिष्ट नेत्यांशी संर्पक केला असता मला काही दिवस थांबण्यासाठी सांगण्यात आले. मात्र  काँग्रेसच्या शेवटच्या यादितही माझे नाव नसल्याने मी दिल्लीवरुन चंद्रपूर परतलो कार्यकर्त्याशी संवाद साधून त्यांच्या ईच्छेनूसार मी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व ४ आँक्टोबरला अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवूण काढली या मिरवणूकीत चंद्रपूरच्या जनतेचा उसळलेला जनसागर लक्षात घेता. अर्ध्या मिरवणूकित मला उमेदवारी  काँग्रेसंच्या वतीने भरावी असे सांगण्यात आले. पक्षाचा एबी फार्मही मला देण्यात आला. त्यानूसार मी  काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आज अर्ज छाननी प्रक्रियेत माझा अर्ज रद्द करण्यात आला. कोणत्याही राष्ट्रिय पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या एबी फार्मची सत्य प्रत गरजेची असते ती मी जोडली,  काँग्रेसच्या दुस-या उमेदवाराने एबी फार्मची नकलप्रत जोडली, तसेच दुस-या उमेदवाराच्या  पहिले माझा अर्ज दाखल झाला. ईतकेच नव्हे तर पक्षाचा दूसरा एबी फार्म देखील माझ्याकडे होता याचा अर्थ पक्षाने मला उमेदवारी जाहिर केली होती. असे असतांनाही केवळ सत्तेचा दूरूपयोग करुन जाणीव पूर्वक माझा अर्ज आज रद्द करण्यात आला. हा अन्याय आहे. त्यामूळे मी आता चंद्रपूरच्या जनतेपूढे जाणार असून जनता जनार्धन जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल. अशी माहितीही किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-05


Related Photos