उमेदवारांनी जात प्रमाणपत्र त्वरित घेवून जावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्ह्याअंतर्गत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन २०१७-१८ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत किंवा स्वत: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया येथे अर्ज सादर केले होते व जे उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडून आले आहे त्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र (त्रुटीची प्रकरणे वगळून) तयार झाले असून संबंधीत उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र मुळ व छायाप्रतसह येऊन आपले प्रमाणपत्र कार्यालयीन वेळेत त्वरित घेवून जावे. जे उमेदवार ७ दिवसाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयातून घेवून जाणार नाही त्यांचे पोष्टाने पाठविण्यात येणार आहेत. संबंधितांना पोष्टाने जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास व वैधता प्रमाणपत्रा अभावी पद रद्द झाल्यास समिती जबाबदार राहणार नाही, याची संबंधितंनी नोंद घ्यावी. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य यांनी कळविले आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2018-09-12


Related Photos