मुलांच्या ओठावर महात्म्याचे गीत असू द्या : अतुल विडूळकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नंदोरी :
गांधी ही न संपणारी गोष्ट असून या जगातील येणाऱ्या  कित्येक पिढ्या महात्मा गांधी यांचा गौरवशाली इतिहास वाचत राहतील.  आजची तरुणाई गोंधळाच्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. यातून त्यांना  बाहेर काढायचे असेल तर  आपल्या मुलांच्या ओठावर महात्म्याचेे गीत असु द्या. कारण हेच गीत त्यांना उद्या प्रकाशमय भविष्य देईल व देशाचा आदर्श नागरिक बनवेल असे मत  चित्रलेखा साप्ताहिकाचे विदर्भ प्रतिनिधी, व आम्ही सारे फाउंडेशनचे कार्यकर्ते  अतुल विडुळकर यांनी व्यक्त केले. ते  महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. 
लोकसाहित्य परिषद, लोकशिक्षण मंडळ,गांधी वाचनालय,व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, तर प्रमुख उपस्थिती डॉ प्रा रवींद्र ठाकरे, लोकसाहित्य परिषद सचिव ज्ञानेश्वर चौधरी, सर्वोदयीं रमेश झाडे, राष्ट्र सेवा दलाचे प्रा अभिजित डाखोरे यांची होती.
अतुल विडुळकर यांनी गांधीजींच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाश टाकला. आधुनिक दृष्टी असलेले गांधी त्यांनी उलगडून दाखविले. अशांत झालेल्या जगाला महात्मा गांधी आणि त्यांचे विचारच प्रभाव पाडून शांतीचे प्रतीक बनेल अशी भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अभिजित डाखोरे तर आभार रमेश झाडे यांनी मानले.
कार्यक्रमाला नगरसेवक धनंजय बकाने, प्रा ज्ञानेश खडसे, डॉ नाखले, प्राचार्य राजेंद्र सातपुते, प्राचार्य मनोहर कोल्हे, माजी प्राचार्य प्रभाकर कोळसे, डॉ प्रा श्रीकृष्ण बोडे,आशिष भोयर,राजेंद्र झोटिंग, बाळासाहेब पुसदेकर, सुरेश डंबारे,तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Wardha | Posted : 2019-10-05


Related Photos