महत्वाच्या बातम्या

  जिल्ह्यातील २८ समाजसेवकांचा आज होणार गौरव


- सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण

- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे उद्या मंगळवार १२ मार्च रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस, एनसीपीए मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे. जिल्ह्यातील २८ समाजसेवकांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे.

अनिल कृष्णराव नगरारे, नयना संजय झाडे, राजकुमार राम हाडोती, दिपक माधवराव निलावार, राजेंद्र डोमाजी करवाडे, डॉ. प्रेमा सुधीर लेकुरवाळे, रामदास नत्थुजी गजभिये, दिलीप सरोधी मतेलकर, राम आनंदराव कावडकर, सुरेश सहदेव पाटिल, बेबी अशोक गौरीकर, शिवदास अर्जुन वासे, प्रा. किशोर शंकर बिरला, राजेश बालकदास हाथीबेड, रमेश बाबुराव फुले, अशोकसिंह वसंतसिंह चौव्हान, कपील रामाजी नारनवरे, डॉ. विनोद गणपतराव गजघाटे, संजय रामचंद्र कठाळे, जयसिंग अमरसिंग कछवाह, उमेश मणिराव पिंपरे, अशोक शिवराम कोल्हटकर, गौरव हरि आळणे, दिनेश बब्रुवान वाघमारे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारात समावेश आहे. सुचेता अशोक कांबळे, गीता मारोतराव इंगोले यांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार तर राजु बाबुलाल शेंडे यांना संत रविदास पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व व्यक्ती यांना  दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.  राज्यातील एकूण ३९३ पुरस्कारार्थ्यांची निवड या चार वर्षाचे पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व प्राप्त व्यक्तींचे नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड तसेच नागपूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी अभिनंदन केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos