मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत २०१४ च्या तुलनेत दुप्पट वाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   प्रतिज्ञापत्रात  कुटुंबाकडे १० कोटी १५ लाख ७२ हजार ३७६ रुपये इतकी स्थावर व जंगम मालमत्ता दाखविली आहे. विशेष म्हणजे  २०१४ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत  दुप्पट वाढ झाली आहे.  २०१४ मध्ये  ४ कोटी ६७ लाख ३६ हजार ३३६ रुपये  इतकी संपत्ती दाखविण्यात आली होती. 
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७ हजार ५०० रुपये रोख असून बँकेत ८ लाख २९ हजार ६६५ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १२ हजार ५०० रुपये रोख असून ३ लाख ३७ हजार २५ रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत. मुख्यमंत्र्यांकडे १४ लाख ३१९ रुपयांचा विमा असून अमृता यांच्याकडे ५ लाख ९२ हजार ६०२ रुपयांचा विमा आहे. मुलगी दिवीजाकडे ८ लाखांचा विमा आहे. मुख्यमंत्र्यांकडे महिंद्रा एक्सयूव्ही-५०० ही कार व व एक दुचाकी, एक किलो ३५० ग्राम सोन्याचे दागिने आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धरमपेठच्या त्रिकोणी पार्क येथील घराचे विकासकाम सुरू असून त्यावर १ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. पत्नी अमृता यांच्या नावाने ९९ लाख ३९ हजारांची अचल संपत्ती आहे.  कंपन्यांमध्ये अमृता यांची १ कोटी ३५ लाख ३९ हजार ७८४ रुपयांची गुंतवणूक असून त्यांच्यावर ६२ लाखांचे कर्जही आहे.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध विविध न्यायालयांमध्ये चार प्रकरणे प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने सतीश उकेंनी दाखल केलेली तीन प्रकरणे आणि मोहनीस जबलपुरे यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी परत पाठवलेल्या एका प्रकरणाचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-10-05


Related Photos