महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षणकरीत अर्ज सादर करण्यास २६ मार्चपर्यंत मुदतवाढ 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD) असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने आहे. प्रशिक्षणा दरम्यान १ हजार दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज ०१ मार्च २०२४ पासुन चालु झाले आहेत. व ते २६  मार्च २०२४ पर्यत या कार्यालयात सादर करावेत. तदनंतर मुलाखत २७ मार्च २०२४ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शनकेंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७१३२-२९५१४३/८४८५८१४४८८ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos