महत्वाच्या बातम्या

  सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरिता सामाजिक क्षेत्रामध्ये अतुलनिय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती व संस्थांना पुरस्कार जाहीर झाले असून १२ मार्च रोजी मुंबई येथे विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सन २०१९-२० करिता वायफड येथील आनंद बहुउद्देशिय संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच वर्धा येथील इंदीरा बहुउद्देशिय महिला विकास संस्थेची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. व्यक्तीगत पुरस्कारामध्ये सन २०२०-२१ करिता गुंजखेडा येथील चरणदास नामदेव इंगोले यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी तसेच सन २०२२-२३ करिता समतानगर, वर्धा येथील राजू उकंडराव थुल यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार व्यक्ती व संस्थेला देण्यात येतो. त्याच प्रमाणे शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय प्राविण्य पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात येतो.





  Print






News - Wardha




Related Photos