५ ऑक्टोबर : आजचे दिनविशेष


– घटना

१८६४: एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० लोक ठार आणि शहर उद्धस्त झाले.
१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.
१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

– जन्म

१८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.
१९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)
१९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)
१९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)
१९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.
१९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)
१९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.
१९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.
१९७५: ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट यांचा जन्म.

– मृत्यू

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)
१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)
१९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)
१९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०७)
१९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)
१९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)
१९९२: नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.
१९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
२०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)  Print


News - todayspecialdays | Posted : 2019-10-05


Related Photos