महत्वाच्या बातम्या

 मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पण नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर यांचे हस्ते पार पडले.

जिल्हा सामान्य रुग्णालय,भंडारा येथे आयोजीत असलेल्या इपिलेप्सी शिबीराचे औचित्य साधून इपिलेप्सी फाऊंडेशन चे संस्थापक व प्रसिध्द न्यूरालॉजिस्ट निर्मल सुर्या तसेच सहायक संचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर डॉ. प्रमोद गवई व रा. आ.अ.कार्यक्रम नागपूर विभाग प्रमुख मनिष नंदनवार यांचे प्रमुख उपस्थीतीत मोबाईल मेडिकल युनिट या कार्यक्रमाचा लोकार्पण करण्यात आला.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोबाईल मेडिकल युनिट उपक्रमाअंतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देण्यात येते. त्यानुसार राज्य कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा आरोग्य सोसायटी भंडारा मार्फत आपल्या भंडारा जिल्हयात एक मोबाईल मेडिकल युनिट जिल्हास्तरावर कार्यान्वित  करण्याचे प्रस्तावित होते.

त्यानुसार जिल्हयातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गावे ज्यात समुदाय आरोग्य अधिकारी सुध्दा नाहित अशी ५० गावांची निवड करण्यात आली. प्रत्येक दिवशी दोन गावे याप्रमाणे सदर गावांमध्ये गरोदर माता, आजारी बालक, जेष्ठ नागरीक इत्यादीनामा मोबाईल मेडिकल युनिट व्दारे आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरीता एक भाडेतत्वावरील वाहन तसेच वैदयकीय अधिकारी, नर्स, प्रयोगशाळा व फार्मासिस्ट अशी चार कर्मचारी असलेली वैदयकीय चमू यांचेव्दारे सदरच्या नागरीकांना त्यांचे गावातच औषधेपचाराचह वैदयकीय सेवा देण्यात येणार आहे

या सेवेचा गावातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य सोसायटी भंडारा मार्फत करण्यात येत आहे.

या कार्यकमाच्या लोकार्पण प्रसंगी अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अतूल टेभुर्णे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित चुटे, जिल्हा लेखा तथा कार्यक्रम व्यवस्थापक राजकुमार लांजेवार, ईएमएस जिल्हा समन्वयक नरेश गायधने व मोबाईल मेडिकल युनिट भंडारा ची चमू प्रामुख्याने उपस्थीत होती.





  Print






News - Bhandara




Related Photos