दुचाकीस्वार चोरट्याने भरदिवसा पळविले महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र


-  गडचिरोली शहरातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
येथील रामनगर कॅम्प एरियातील रहिवासी  मालुताई गोपिदास म्हशाखेत्री (६५) वर्षे यांच्या गळ्यातील ३ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे  मंगळसुत्र मोटारसायकलवर असलेल्या अज्ञात चोरांनी पळविल्याची घटना आज ४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. 
आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान  मालुताई गोपीदास म्हशाखेत्री ही महिला घराजवळ असलेल्या अ‍ॅड.मांडवे यांच्या घरी महिला शाखा मंडळातील देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर परत येत असतांना मोटारसायकलवर असलेल्या एका ३० ते ३५ वयाच्या युवकाने जवळ येवुन मोटारासयकल वाकविली व गळ्यातील ३ तोळे ८ ग्रॅमचे मंगळसुत्र झटका मारून ओढले. मंगळसूत्राची किंमत १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. 
घटनास्थळावरून पळ काढत असतांना देवी जवळील काही स्त्रियांनी पाठलाग केला. मात्र तो वेगाने मोटारसायकल घेवुन पळाला. अज्ञात चोर हा काळ्यापिवळया रंगाचा चेकचा शर्ट व काळया रंगाचा पॅन्ट घातला होता. चेहऱ्यावर काळया रंगाची रूमाल बांधली होती. या घटनेची तक्रार पोलिस स्टेशन गडचिरोली येथे दुपारी १२ वाजता देण्यात आली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos